
नांदेड, ३० मार्च (हिं.स.) : उमरी खरेदी विक्री संघाची निवडणूक पहाडगल्लीतील जिल्हा परिषद शाळेत पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनल आणि भाजपच्या सहकार बचाव पॅनलमध्ये थरारक सामना पाहायला मिळाला.
निवडणुकीत गोरठेकर गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत बाजी मारली, तर भाजपच्या पॅनलकडून आ. राजेश पवार व मारोतराव कवळे गुरुजी यांच्या गटाचे ३ सदस्य निवडून आले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलच्या यशस्वी उमेदवारांमध्ये बाजार समितीचे सभापती शिरीष गोरठेकर, उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, प्रल्हाद पाटील ढगे, गणेशराव पाटील गाढे, माजी नगराध्यक्ष प्रवीण सारडा, प्रकाश पाटील चिंचाळकर, सुभाषराव गोरठेकर, सुधाकर देशमुख धानोरकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजीव पाटील ढगे यांचा समावेश आहे.
भाजपच्या पॅनलकडून आ. राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, डॉ. विक्रम देशमुख, बापूसाहेब पाटील कौडगावकर, ज्ञानेश्वर पाटील सावंत, अमोल पाटील ढगे, नागनाथ पांचाळ, आनंद चव्हाण, शिवाजी कदम, दादाराव पवळे यांचा सहभाग होता.उमरी खरेदी विक्री संघाच्या १२ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात होते.
गोरठेकर गटातून विजयी झालेले सदस्य:
वैयक्तिक गटातून :- राघोजी माधवराव जाधव, बालाजी पाटील पवार हातनीकर
महिला गटातून :- कलावतीबाई ढगे, ललिता यल्लमगोंडे
अनुसूचित जाती -जमाती :- लक्ष्मण हिरमोड
इतर मागासवर्गीय गट :- मारोती आनेराये
सहकारी संस्था गटातून :- व्यंकटराव कदम, नारायण जिरोणेकर, रावसाहेब पवार
तसेच गणेश अन्नेमवाड हे बिनविरोध निवडून आले.
भाजपच्या पॅनलमधून निवडून आलेले सदस्य :- दादाराव गायकवाड, अशोक मोरे, माधवराव पवळे.
विशेष म्हणजे, नारायणराव जिरोणेकर, जे गेल्या २५ वर्षांपासून संस्थेवर कार्यरत आहेत, त्यांनी पुन्हा गोरठेकर गटाच्या तिसऱ्या पिढीवर विश्वास ठेवत संघाचा नेतृत्व स्वीकारले आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis