
छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च (हिं.स.)।
येत्या २ एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदीर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त तेथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यामुळे तेथे रहदारी सुरळीत रहावी यासाठी या मार्गावरील जड वाहतुक मार्गात दि.१ ते ३ एप्रिल या कालावधीकरीता बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.
बदलेले वाहतुक मार्ग याप्रमाणे-
१. कन्नड, वेरुळ, खुलताबाद, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कन्नड, वेरुळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरनापुर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
२. छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरनापुर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.
३. फुलंब्री, सुलतानपुर, खुलताबाद, वेरुळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरनापुर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेड फाटा, वेरुळ मार्गे कन्नड कडे जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis