
नाशिक, 30 मार्च (हिं.स.)।
- भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणांमध्ये आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून नासिक शहरांमध्ये काही महिन्यापूर्वी दाखल झालेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातही सहभाग असल्याचे समोर आले आहे यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून हे प्रकरण समोर आल्यामुळे त्या वेळचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या देखील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
18 मार्च रोजी अटक करण्यात आलेला भोंदू बाबा अशोक खरात चे कारनामे काहीही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये दिवस न दिवस नवीन कारनामे समोर येत आहे. 24 मार्चला खरातची कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यावेळी 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली होती. आता एक एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे एसआयटीच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे
सर्वसाधारण नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला शालेय आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्यामध्ये माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली आहे तर या सर्व प्रकरणांमध्ये सर्वसाधारण 159 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सहभागी असल्याचे समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणात अजून काही मोठी कारवाई होण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती.
या शालेय आयडी घोटाळ्याच्या तपास सुरू आहे आता या प्रकरणांमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याचे देखील नाव समोर आलेले आहे ज्यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री होते त्याचवेळी हा घोटाळा झालेला आहे आणि त्यादरम्यानच दीपक केसरकर हे वारंवार भोंदू बाबा खरातकडे येत होते यामुळे मोठ्या प्रमाणावर ती आता या सर्व प्रकरणात त्याचा हस्तक्षेप असल्याचे समोर आलेले आहे या प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत केला जाणार आहे. स्वतः खरात येणे आपल्या भावासाठी देखील शालेय आयडी मिळून दिल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV