कोल्हापूर-परिते ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर, 30 मार्च (हिं.स.)श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी परिते तालुका करवीर येथील ग्रामस्थ भाविकांना मारहाण करून गुंडगिरी केल्याच्या निषेधार्थ परिते गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भाविकांनी आज जिल्हाधिकारी कार्याल
परिते ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


कोल्हापूर, 30 मार्च (हिं.स.)श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी परिते तालुका करवीर येथील ग्रामस्थ भाविकांना मारहाण करून गुंडगिरी केल्याच्या निषेधार्थ परिते गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भाविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ज्योतिबा मंदिरातील मुजोर व गुंडगिरी करणाऱ्या पुजारांच्यावर कडक कारवाई करावी, पारंपारिक पुजारी हटवून या ठिकाणी पगारी पुजारी नेमावेत, देणगी पेट्या शासकीय ठेवाव्यात, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

परिते तालुका करवीर गावची यात्रा दरवर्षी श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिरात सासनकाठी नेऊन त्याची पूजा करून गावात आल्यानंतर सुरू होते. ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरू असून यावर्षी 22 मार्च रोजी असलेल्या यात्रेसाठी परिते गावचे सरपंच तसेच अन्य ग्रामस्थ सासन काठी घेऊन जोतिबा डोंगरावर ज्योतिबा मंदिरात गेले होते. या ठिकाणी सासन काठीची पूजा करून त्याची प्रदक्षिणा घालण्यासाठी वाजत गाजत जात असताना मंदिरातील पुजाऱ्याला एका वादकाचा धक्का लागला. यावरून झालेल्या वादातून मंदिरातील पुजाऱ्यांनी एकत्र येऊन परिते ग्रामस्थांना बेदम मारहाण केली. तसेच सरपंचासह प्रमुख मंडळींना कोंडून ठेऊन त्यांचा जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतला. याबरोबरच परिते ग्रामस्थांच्यावर मद्यप्राशन आणि महिलांची छेडछाड केल्याचे आरोप केले. यामुळे संतप्त झालेल्या परिते ग्रामस्थांनी ज्योतिबा मंदिरातील पुजाऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. याचाच एक भाग म्हणून गाव बंद आंदोलन तसेच आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परितेसह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ व भाविक ही सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने जोतिबा मंदिरातील पुजाऱ्यांची सर्वच भाविकांच्या वर होणारी मुजोरी, अरेरावी आणि गुंडगिरी मोडून काढली पाहिजे ही भावना होती.

विजय उर्फ मनोज धोंडीराम पाटील (सरपंच, ग्रामपंचायत परिते), जनार्दन गुंडू पाटील (राज्य सचिव, शेतकरी सेना महाराष्ट्र राज्य), अजित पांडुरंग पाटील (जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना कोल्हापूर), सर्जेराव महिपती पाटील (अध्यक्ष तंटामुक्त समिती परिते), सुनील आनंदराव कारंडे (मा. संचालक भोगावती. सह.सा. कारखाना), विलास तुकाराम पाटील (मा. ग्रामपंचायत सदस्य परिते), आशितोष शिवाजी पाटील (मा.डे. सरपंच ग्रामपंचायत परिते) यांच्या नेतृत्वा खाली

कोल्हापूर शहरातील दसरा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चासाठी परिते ग्रामस्थांनी काही फलक, बॅनर तसेच डिजिटल फलक आणले होते. यामध्ये जोतिबा मंदिरातील पुजाऱ्यांची कशा पद्धतीने अरेरावी चालते याचे सजीव देखावे ही मांडले होते. परिते गावच्या यात्रेत तीन दिवस सलग परिसरातील दारू दुकाने बंद करण्याची प्रथा गेले अनेक वर्षे पाळली जाते. असे असताना गावातील कोणीही मद्यप्राशन करून ज्योतिबा डोंगरावरील मंदिरात जाऊन दारू पिऊन दंगा करण्याची शक्यता ग्रामस्थांनी फेटाळून लावत पुजाऱ्यांच्या या खोट्या आरोपाचा ही निषेध केला. तसेच पुजाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भाविकांशी सौजन्याने वागले पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.

परिते ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात गुंडगिरी करणाऱ्या पुजाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमवेत या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande