
नांदेड, 30 मार्च (हिं.स.)।
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी माहूरगड येथील विकास आराखड्याचा आढावा घेतला. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
या प्रसंगी नांदेडच्या महापौर कविता मुळे, माजी आमदार अमर राजूरकर, प्रवीण साले आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार चव्हाण यांनी प्रभू दत्तात्रेय मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प.पू.प. महंत मधुसूदनजी भारती महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्याच्या अनुषंगाने असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
माहूर हे धार्मिक पर्यटन केंद्र असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या ठिकाणी मागील काही वर्षांपासून भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प हाती घेतले आहेत. या सर्व कामांचा आढावा खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतला.
खासदार चव्हाण यांचा माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी तसेच इर्शाद हाजी मकरानी यांनी सत्कार केला. यावेळी नामदेवराव केशवे, नगरसेवक गोपू महामुने आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis