सफाळे ग्रामपंचायतीच्या मेघना संखे यांचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मान
पालघर, 30 मार्च (हिं.स.)। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघर जननायक बिरसा मुंडा सभागृह येथे उत्साहात पार पडला
सफाळे ग्रामपंचायतीच्या मेघना संखे यांचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मान


पालघर, 30 मार्च (हिं.स.)।

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघर जननायक बिरसा मुंडा सभागृह येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी मेघना मनीष संखे यांना सन 2022 - 23 ते 24- 25 या वित्तीय वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande