रायगड : एप्रिलमध्ये डिजिटल शेती शाळा सुरू
रायगड, 30 मार्च (हिं.स.)।एप्रिलमध्ये विशेष डिजिटल शेती शाळा; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२६ महिन्यात विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृष
एप्रिलमध्ये विशेष डिजिटल शेती शाळा; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन  जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२६ महिन्यात विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीसमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश उत्पादन खर्च कमी करून प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित ठेवणे हा आहे.  या अभियानांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या शेती शाळांद्वारे कृषी विद्यापीठातील तज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून विविध आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.  शेती शाळांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे — १ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, कमी मशागत, आंतरपीक पद्धती व बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन केले जाईल. ८ एप्रिल रोजी जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन, बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क व ट्रायकोडर्मा याबाबत माहिती दिली जाईल. १५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा होईल. २२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र, थेट पेरणी (DSR), श्री पद्धत व यांत्रिकी लागवड यावर मार्गदर्शन केले जाईल.  सर्व शेती शाळा सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार असून, या सत्रांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद यांच्या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.  शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी मंडळे, बीज उत्पादक तसेच वनपट्टाधारक यांनी या डिजिटल शेती शाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.


रायगड, 30 मार्च (हिं.स.)।एप्रिलमध्ये विशेष डिजिटल शेती शाळा; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिल २०२६ महिन्यात विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेतीसमोर गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश उत्पादन खर्च कमी करून प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित ठेवणे हा आहे.

या अभियानांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या शेती शाळांद्वारे कृषी विद्यापीठातील तज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून विविध आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

शेती शाळांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे —

१ एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे, कमी मशागत, आंतरपीक पद्धती व बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन केले जाईल.

८ एप्रिल रोजी जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन, बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क व ट्रायकोडर्मा याबाबत माहिती दिली जाईल.

१५ एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा होईल.

२२ एप्रिल रोजी भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र, थेट पेरणी (DSR), श्री पद्धत व यांत्रिकी लागवड यावर मार्गदर्शन केले जाईल.

सर्व शेती शाळा सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार असून, या सत्रांचे थेट प्रक्षेपण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद यांच्या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.

शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी मंडळे, बीज उत्पादक तसेच वनपट्टाधारक यांनी या डिजिटल शेती शाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande