
बीड, 30 मार्च (हिं.स.) : गायरानधारकांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी युवा रिपाइं प्रदेशाचे प्रमुख पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, 31 मार्च 2026 रोजी दुपारी साडेबाराची वेळ, शहरातील राघव फंक्शन हॉल, बस डेपो समोर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यास राजू जोगदंड, सचिन कागदे, दीपक कांबळे, दशरथ सोनवणे, कपिल कागदे, राणीताई गायकवाड, राहुल गंडले, विलास वाघमारे, मधुकर कसबे, कोमल मस्के, करण साळवे, उमेश बचाटे, भाऊ कोरडे, यशवंत पट्टेकर, राहुल जोगदंड, गणेश कसबे, किरण खंडागळे यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यातील प्रमुख मागण्या :-
गायरानधारकांना सरसकट सातबारा देणे
नाव झालेल्या गायरान जमिनीची नोंद
वर्ग एकमध्ये करणे
गायरान-गावठाण
वस्तीमधील घरकुलधारकांना मालकी हक्काचा पीटीआर प्रदान करणे
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करणे
शहरी व ग्रामीण भागात महिला स्वावलंबी योजना सुरू करणे
तालुका अध्यक्ष प्रमोद दासूद, शीतल मस्के, नीता गायकवाड, शीतल गायकवाड, शोभा बनसोडे, शांता कांडुके, सुरेखा इंगळे, मयूर दासूद, विकास सुरवसे, सुरेश कांबळे, गणेश टेकाळे, सोमेश्वर गंडले, सागर ओगले, विकास जोगदंड, सुरज गव्हाणे, बंडू कांबळे, महादेव कासिकर यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis