
नाशिक, 30 मार्च (हिं.स.)।
- संदीप फाऊंडेशन व संदीप विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'संदीप मेगा जॉब फेअर २०२६' पार पडला. या जॉब फेअरमध्ये जवळपास २०० हून अधिक - नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. तर तब्बल ६५०० - विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून विविध - कंपन्यांच्या मुलाखतींमध्ये सहभाग घेतला. या प्रक्रियेदरम्यान जवळपास १ हजार विद्यार्थ्यांना तत्काळ ऑफर - लेटर प्रदान करण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी दिली.
या जॉब फेअरमध्ये संदीप फाऊंडेशन व संदीप विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह जळगाव, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे व परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हा उपक्रम केवळ जॉब फेअरपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा दूरदृष्टीपूर्ण प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. दरवर्षी ३००० ते ४००० विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून, मागील वर्षांची यशस्वी परंपरा कायम राखत यंदाही हा जॉब फेअर आयोजित करण्यात आल्याचे आर्यन झा यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV