नांदेड जिल्ह्यात नंदी महादेवाची बारशी यात्रा उत्साहात सुरू
नांदेड, 30 मार्च (हिं.स.) : लहान येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध नंदी महादेवाच्या श्री बसवेश्वर देवस्थानच्या बारशी यात्रा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोनदिवसीय यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आ
नांदेड जिल्ह्यात नंदी महादेवाची बारशी यात्रा उत्साहात सुरू


नांदेड, 30 मार्च (हिं.स.) : लहान येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध नंदी महादेवाच्या श्री बसवेश्वर देवस्थानच्या बारशी यात्रा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दोनदिवसीय यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

हेमाडपंती शैलीतील प्राचीन नंदी महादेव मंदिर, जिल्ह्यात ‘बसवेश्वर’ नावाने परिचित असून, शासनाकडून या देवस्थानास ‘श्रीक्षेत्र क’ दर्जा प्राप्त आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरील भव्य स्वागत कमान यात्रेच्या वैभवात भर घालत आहे. नंदीच्या मूर्तीला आकर्षक अलंकारांनी सजवले असून, संपूर्ण मंदिर पुष्पहारांनी सुशोभित करण्यात आले आहे.यात्रेच्या आयोजन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील भाविकांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी, 31 मार्च रोजी पहाटे ५ वाजता श्री बसवेश्वराची पालखी सोहळा आणि नूतन कलशाची गाव प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या हस्ते महादेव मंदिरावर कलशरोहण होईल. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता केली जाईल.

याच दिवशी दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत कुस्तीची भव्य दंगल रंगणार आहे. विजेत्या पहिलवानांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम बक्षीस ७७७७ रुपये (चंद्रकांत गवते पाटील), द्वितीय बक्षीस ५५५५ रुपये (कै. संजयराव पाटील इंगळे स्मरणार्थ), तृतीय बक्षीस ३३३३ रुपये (कै. हाजी अहमदसाब शेख हॅदरसाब स्मरणार्थ) आणि इतरही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते होणार आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande