बेटमोगरा येथे चैत्र बारस यात्रा सुरु, उद्या जंगी कुस्त्याचे सामने
नांदेड, 30 मार्च (हिं.स.)। मुखंड तालुक्यातील बेटमोगरा येथे श्री शिवलिंग बादशहा मठ संस्थानच्या वतीने चैत्र बारस यात्रा व शिवकीर्तन महोत्सव सुरु झाला आहे. महोत्सवाच समारोप दि. १ एप्रिल रोजी होणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन क
बेटमोगरा येथे चैत्र बारस यात्रा सुरु, उद्या जंगी कुस्त्याचे सामने


नांदेड, 30 मार्च (हिं.स.)।

मुखंड तालुक्यातील बेटमोगरा येथे श्री शिवलिंग बादशहा मठ संस्थानच्या वतीने चैत्र बारस यात्रा व शिवकीर्तन महोत्सव सुरु झाला आहे. महोत्सवाच समारोप दि. १ एप्रिल रोजी होणार आहे.

या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिषेक, गुरु समाधीस्थ रुद्राभिषेक, प्रवचन, भजन आणि रात्री शिवकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवात विविध भागांतील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. यात निलेश मुगुंडे (खानापूर), सौ. शिवकांता रामदास पाटील (मुखेड), शिवानी समदास वसमते (बालकीर्तनकार), कैलास महाराज जामकर (डोंगरगाव), अनेक जण उपस्थित राहणार आहेत. श्री शिवलिंग बादशहा मठ संस्थान, बेटमोगरा यांच्या वतीने सर्व भाविकांना या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी कुस्त्यांची दंगल

चैत्र बारस यात्रेनिमित्त दि. ३१ मार्च रोजी भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. या दंगलीतील आकर्षण ठरणारी अंतिम कुस्ती विजेत्यास कै. बालासाहेब मारोतीराव पाटील बाऱ्हाळे यांच्या स्मरणार्थ तब्बल ५१ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. ५१ रुपये ते ५१ हजारापर्यंतच्या कुस्त्या लावण्यात येणार आहेत. पंचायत समिती मुखेडचे उपसभापती लक्ष्मण पाटील बाहऱ्हाळे यांच्या पुढाकारातून या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चैत्र बारस यात्रेनिमित्त या कुस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने पैलवानांनी सहभाग नोंदवावा तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande