शिवसेना उबाठा गटाची १ व २ एप्रिल रोजी राज्यव्यापी आढावा बैठक
मुंबई, 30 मार्च (हिं.स.) : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे १ आणि २ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती व पक्ष संघटनेचा सखोल आढावा घेणार आहेत. आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, या दोन दिवसांत जिल्हा स
Uddhav Thackeray


मुंबई, 30 मार्च (हिं.स.) : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे १ आणि २ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती व पक्ष संघटनेचा सखोल आढावा घेणार आहेत. आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, या दोन दिवसांत जिल्हा संपर्क प्रमुखांच्या स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी १ एप्रिल रोजी ( बुधवारी) पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाडा विभागांतील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक होणार आहे. तर २ एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील संपर्क प्रमुखांशी संवाद साधण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्रितपणे राज्यातील राजकीय घडामोडी, पक्षाची स्थिती आणि आगामी रणनीती यावर चर्चा करणार असल्यामुळे या बैठकींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पक्षाकडून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नगरसेवकांवर निरीक्षक म्हणून जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, विविध जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे, नाशिक, नागपूर, वर्धा, पालघर, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांसाठी संबंधित नगरसेवकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.या बैठकींमधून पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande