
रायगड, 30 मार्च (हिं.स.)।
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट-क संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासोबतच गट-ड संवर्गातील अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.raigad.gov.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यादीतील नाव, क्रमांक किंवा इतर तपशीलांबाबत कोणत्याही उमेदवाराला हरकत अथवा आक्षेप असल्यास, त्यांनी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत आपला लेखी अर्ज दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)