परभणी : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत सोनपेठमध्ये 217 घरकुलांना मंजुरी
परभणी, 31 मार्च (हिं.स.)। शहरातील घरकुल प्रश्न सोडवण्यासाठी कार्यक्षम नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत तब्बल 217 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्
परभणी : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत सोनपेठमध्ये 217 घरकुलांना मंजुरी


परभणी, 31 मार्च (हिं.स.)। शहरातील घरकुल प्रश्न सोडवण्यासाठी कार्यक्षम नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत तब्बल 217 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य व गरजू कुटुंबांचे हक्काच्या पक्क्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

नगर परिषद प्रशासनाकडे घरकुलासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 217 प्रस्तावांना पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळाली आहे. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या प्रयत्नांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात घरकुले साकार होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, काही प्रस्तावांमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी असल्याने त्यांची प्रक्रिया प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थ्यांनी या त्रुटींची तातडीने पूर्तता करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

केंद्रीय गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्या या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना सन्माननीय व सुरक्षित पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच या योजनेत घरांची मंजुरी महिलांच्या नावे किंवा संयुक्त नावे दिली जात असल्याने महिला सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळत आहे.

एकंदरीत, शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील घरकुल योजनेला गती मिळाली असून, मुख्याधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित प्रस्तावांची छाननी सुरू आहे. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

लाभार्थ्यांनी त्रुटी दूर करून प्रस्ताव पूर्ण करावेत...

सोनपेठ शहरातील एकही पात्र कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही. 217 घरकुलांना मंजुरी मिळणे ही शहर विकास आघाडीच्या कामाची केवळ सुरुवात आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांतील त्रुटी तात्काळ दूर करून प्रस्ताव पूर्ण करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande