नांदेड - मध्यवर्ती बसस्थानकात स्मार्ट कार्डबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती
नांदेड, 31 मार्च (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विश्वासू प्रवासी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रवाशांना स्मार्ट कार्ड विषयी तसेच ७५ वर्षानंतरच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफ
नांदेड - मध्यवर्ती बसस्थानकात स्मार्ट कार्डबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती


नांदेड, 31 मार्च (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विश्वासू प्रवासी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रवाशांना स्मार्ट कार्ड विषयी तसेच ७५ वर्षानंतरच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासासाठी तसेच बारा ते ६४ वर्षापर्यंत मुली व महिलांना हाफ तिकीटासाठी स्मार्ट कार्ड बद्दल तसेच शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांना सुद्धा स्मार्ट कार्ड माहिती देण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त यांना सवलत तथा मोफत प्रवासादरम्यान स्मार्ट कार्डबद्दल माहिती व सादरीकरण करण्यात आले तसेच मार्गदर्शन करण्यात आले.

त्या मध्ये सवलतीसाठी रुपे ऑन दगो एन सी एम सी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे, लवकरच यापुढे एनसीएमसी कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल, याची डिलिव्हरी ३० दिवसात नोंदणीच्या ठिकाणी मिळेल, सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेट मधूनच दिले जाईल, वॉलेटकॅश किंवा यूपीआय ने टॉप अप करता येईल, एन सी एम सी कार्डवर आधार कार्ड नुसार नाव व फोटो असतील, सदर कार्ड रोख समतुल्य व अहस्तांतरणीय आहे, सवलतीधारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे, हरवलेली किंवा खराब झालेली कार्ड सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येतील, सर्व सवलत धारकांना व मोफत प्रवास करणा-या प्रवाश्यांना कागदपत्र आवश्यक आहे महिला, आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक, आधार कार्ड, अमृत ज्येष्ठ नागरिक, आधार कार्ड, दृष्टीहीन, वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग शारीरिक अपंग वैश्विक ओळखपत्र, विद्यार्थी सरळ क्रमांक, इतर सर्व सवलती, शासकीय प्रमाणपत्र, दौलत नसलेले प्रवासी, मोबाईल ओटीपी इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी बसस्थानक प्रमुख यासिन खान, विश्वासू प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर, मनोज पाटील, संभाजी धुतराज, राजेश वाघमारे, अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande