परभणी लोकसभा संपर्कप्रमुखपदी भास्करराव आंबेकर यांची नियुक्ती
परभणी, 31 मार्च, (हिं.स.)। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये राज्यभर संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा संपर्कप्रमुख पदांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार परभणी लोकसभा संपर्कप्रमुखपदी जालना येथील शिवस
परभणी लोकसभा संपर्कप्रमुखपदी भास्करराव आंबेकर यांची नियुक्ती


परभणी, 31 मार्च, (हिं.स.)। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये राज्यभर संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा संपर्कप्रमुख पदांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार परभणी लोकसभा संपर्कप्रमुखपदी जालना येथील शिवसेनेचे जुने सदस्य भास्करराव आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आंबेकर यांनी मराठवाड्यात शिवसेना वाढीसाठी अर्जुन खोतकर यांच्या समवेत कार्य करत गावोगावी संघटना बळकट केली असून सर्वसामान्यांमध्ये पक्षाचे विचार रुजविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या नियुक्तीबद्दल आंबेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख माणिक पोंढे पाटील यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande