
परभणी, 31 मार्च (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कार्यरत शाखा अभियंते इंजि. प्रशांत ईटकर, इंजि. रविंद्र हरदास व इंजि. विद्या टेहरे यांना शासनाने उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नती दिली आहे.
या पदोन्नतीनिमित्त सार्वजनिक बांधकाम उपविभाग, परभणी येथे मंगळवारी (दि. 31) सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अभियंता बी. एम. शिंदे, शाखा अभियंता लव्हेकर, सहायक अभियंता (श्रेणी-2) देवकते व कनिष्ठ अभियंता शेळके यांच्या हस्ते पदोन्नत अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis