हिराजी बाबा यात्रेला सुरुवात; आमदार संजना जाधव यांनी दिली भेट
छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.)। पिशोर गावाचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या हिराजी बाबा यात्रेला सुरुवात झाली असून परिसरातील भाविकांसाठी ही यात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विविध पाळणे, खेळणी, सर्कस तसेच मोठ्या झुल्यांसह मनोरंजनाची साधने या
हिराजी बाबा यात्रेला सुरुवात; आमदार संजना जाधव यांनी दिली भेट


छत्रपती संभाजीनगर, 31 मार्च (हिं.स.)। पिशोर गावाचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या हिराजी बाबा यात्रेला सुरुवात झाली असून परिसरातील भाविकांसाठी ही यात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विविध पाळणे, खेळणी, सर्कस तसेच मोठ्या झुल्यांसह मनोरंजनाची साधने यामुळे यात्रेला विशेष रंगत आली आहे. ही यात्रा तब्बल पंधरा दिवस चालणार असून पिशोरसह परिसरातील अनेक गावांमधून महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत.

आमदार संजना जाधव यांनी हिराजी बाबा मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्यवर्धन जाधव उपस्थित होते. मंदिरात आगमन झाल्यानंतर हिराजी बाबा देवस्थानाच्या वतीने आमदार जाधव यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सपोनि शिवाजी नागवे, दिलीप अप्पा नवले, राजेंद्र मोकासे, गणेश मोकासे, आक्रम शेख, भानुदास सुरडकर, महादू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यात्रेतील आकर्षणांचा आनंद घेत आमदार संजना जाधव यांनी आपल्या मुलगा आदित्यवर्धन

जाधव यांच्यासह पाळण्यात बसून यात्रेचा आनंद लुटला. त्यांच्या या साध्या आणि आनंदी सहभागामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हिराजी बाबा यात्रेमुळे पिशोर गावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून यात्रेला दररोज मोठी गर्दी होत आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये किंवा अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पिशोर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande