शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदी खासदार ज्योती वाघमारे
सोलापूर, 31 मार्च (हिं.स.)। सोलापूर शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या संघटनात्मक रचनेत फेरबदल करण्यात आले असून, खासदार ज्योती वाघमारे यांची शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर न
Waghmare


सोलापूर, 31 मार्च (हिं.स.)। सोलापूर शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या संघटनात्मक रचनेत फेरबदल करण्यात आले असून, खासदार ज्योती वाघमारे यांची शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनेची बांधणी लक्षात घेता शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार वाघमारे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल बोलताना खासदार ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विचार आणि जनहितार्थाची कामे घराघरांत पोहोचवण्याचा माझा मानस आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. या नियुक्तीबद्दल त्यांचे राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदन होत असून, यासोबतच अन्य लोकसभा मतदारसंघांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सर्व नवनियुक्त संपर्क प्रमुखांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande