अमरावती : मिनी मंत्रालयात मार्च एंडिंगची लगीनघाई; प्रशासन बिझी मोडवर
अमरावती, 31 मार्च (हिं.स.) | जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत मार्च एंडिंगची लगीनघाई सुरू असून मागील काही दिवसांपासून झेडपीतील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. मंगळवारी (ता.३१) मध्यरात्री एका क्लीकवर जिल्हा
मिनी मंत्रालयात मार्च एंडिंगची लगीनघाई प्रशासन बिझी मोडवर


अमरावती, 31 मार्च (हिं.स.) | जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत मार्च एंडिंगची लगीनघाई सुरू असून मागील काही दिवसांपासून झेडपीतील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. मंगळवारी (ता.३१) मध्यरात्री एका क्लीकवर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा फंड टान्सफर होणार आहे. कुठलीही उणीव राहू नये, यासाठी सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती.

सध्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये मार्च एंडिंगची धूम सुरू आहे. त्यातल्या त्यात जिल्हा परिषद ही महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था असून दरवर्षी विविध शीर्षाखाली झेडपीच्या तिजोरीत शासनाकडून निधी पाठविण्यात येतो. जिल्हा परिषदेचा नुकताच ४० कोटींचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र तसेच मुख्य वित्त व लेखाधिकारी शिल्पा पवार यांनी सादर केला. त्यानुसार विविध शीर्षाचे पैसे शासनाकडून येणे असून ३१ मार्चला ते कोषागारात जमा होतील तसेच नंतर लगेचच जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा करण्यात येतील.

बांधकाम विभाग हाऊसफुल्ल मार्च एंडिंगमुळे सर्वाधिक वर्दळ बांधकाम विभागात दिसून येत आहे. विविध कामांच्या देयकांसाठी कंत्राटदारांची एकच गर्दी झालेली दिसून येत आहे. यासोबतच वित्त विभाग, आरोग्य विभाग, आरोग्य अभियान, समाजकल्याण विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग दिसून येत आहे. एकूणच जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत येणारे काही दिवस तरी मार्च एंडिंग फिव्हर राहण्याचे संकेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande