डोंबिवली - रेल्वे विरोधात निळजे ग्रामस्थांची बेमुदत उपोषण लढ्याला स्थगिती
डोंबिवली, 31 मार्च, (हिं.स.)। रेल्वे प्रशासनाने निळजे गावातील पूर्वीपासून ये - जा करण्यासाठी असलेले रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा त्रास होत होता. पूर्वीची या वि
Sthagiti uposhan


डोंबिवली, 31 मार्च, (हिं.स.)। रेल्वे प्रशासनाने निळजे गावातील पूर्वीपासून ये - जा करण्यासाठी असलेले रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा त्रास होत होता. पूर्वीची या विषयी आंदोलन करून प्रशासनाला जागे केले होते. हा प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने देऊनही हा विषय दुर्लक्षित ठेवला होता. यामुळेच अखेर निळजे आणि २७ गावातील नेत्यांच्या सहकाऱ्याने ग्रामस्थानी बेमुदत उपोषण लढा दिला होता. याची दखल आमदार राजेश मोरे यांची घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठकीतून मार्ग काढला. परिणामी लेखी आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थानी हा लढा तात्पुरता स्थगित ठेवला आहे. ग्रामस्थांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे यांचे आभार मानले आहेत.

शुक्रवारी २८ तारखेला निळजे गावात ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण केले होते. उपोषणाकर्त्यांची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पोहोचलली असता त्यांनी रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांशी याबाबत चर्चा करून तोडगा काढावा असे निर्देश दिले. त्यानुसार सोमवार ३० तारखेला शिवसेना आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक नितीन पाटील व गावकरी यांनी रेल्वे प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे म्हणत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून मिळाले आहे असे आमदार मोरे यांनी सांगितले. मंगळवारी आमदार मोरे यांनी निळजे गावात उपोषणकर्त्यांची भेट घेतली असता गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे यांचे आभार मानले. मात्र हे उपोषण तात्पुरते स्थगित झाले असून आम्हाला न्याय मिळाला नाही तर पून्हा सुरु करू असा इशारा गावकऱ्यांनी यावेळी दिला.

यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले, निळजे ग्रामस्थावर आंदोलनाची वेळ आली कारण येथील रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. यामुळे शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, दवाखान्यात जाण्यासाठी ग्रामस्थांना रेल्वे फाटक ओलांडून जावे लागते. या ठिकाणी भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे. या समस्यावर गावकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र रेल्वे प्रशासनाने यावर ठोस पाऊले उचलली नाही. अखेर गावाकऱ्यांनी बेमुदत उपोषण करून रेल्वे प्रशासनाला जागे करण्याचे काम केले. कल्याण लोकसभा मतदार संघातील निळजे गावातील हि समस्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना समजली असता त्यांनी लगेच रेल्वे प्रशासनाच्या संबंधित विभागाला संपर्क करून हि समस्या तात्काळ सोडविण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी रेल्वे प्रशासन अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून सकारात्मक निर्णय दिला आहे. लवकर याठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरु होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानतो.

तर ग्रामस्थ प्रकाश पाटील म्हणाले, आमच्या मागण्या ऐकूण घेतल्यानंतर काही वर्षांनी रेल्वे अधिकारी बदली किंवा निवृत्त होतात व आमच्या मागण्या तशाच राहतात. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरु आहे. अखेर आम्ही बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाबरोबर आमची सकारात्मक चर्चा जरी झाली असली तरी आमच्या मानत अजूनही धाकधूक आहे. यावेळी रेल्वे प्रशासनाने पर्यायी भुयारी मार्गाचे काम लवकर सुरु करण्याचे आश्वासन जरी दिले असले तरी याकडे रेल्वेने लक्ष दिले नाही तर आम्ही पुढील वेळी उपोषण नव्हे तर रेल्वे रोको आंदोलन करू असा इशारा दिला.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande