पेट्रोलसाठी आणली चक्क 500 लिटरची टाकी
जळगाव, 31 मार्च, (हिं.स.) मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन साठवणुकीचा संशय निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिक इंधन भरण्यासाठी रांगा लावत असतानाच एका व्यक्
500 लिटरची टाकी आणली


जळगाव, 31 मार्च, (हिं.स.) मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाटा परिसरातील एका पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन साठवणुकीचा संशय निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिक इंधन भरण्यासाठी रांगा लावत असतानाच एका व्यक्तीने तब्बल ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये पेट्रोल भरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती इंधनाची साठवणूक करून भविष्यात काळाबाजार करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पेट्रोल पंप प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाक्यांमध्ये इंधन भरण्यास परवानगी देणे नियमबाह्य असल्याचे सांगितले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande