पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामात प्रवाशांसाठी यंदा नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरू
पुणे, 31 मार्च, (हिं.स.)। पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामात प्रवाशांसाठी यंदाच्या वेळापत्रकात बागडोगरा, सोलापूर, तिरुपती आणि मंगळूर या चार नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) १५ नवीन स्लॉटना मंजुर
airport


पुणे, 31 मार्च, (हिं.स.)। पुणे विमानतळाच्या उन्हाळी हंगामात प्रवाशांसाठी यंदाच्या वेळापत्रकात बागडोगरा, सोलापूर, तिरुपती आणि मंगळूर या चार नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) १५ नवीन स्लॉटना मंजुरी दिली आहे.

पुणे विमानतळ प्रशासनाने नवीन उन्हाळी वेळापत्रक लागू केले आहे. यानुसार, एक मेपासून १५ अतिरिक्त स्लॉट कार्यान्वित होतील, ज्यामुळे विमानतळाची एकूण स्लॉट क्षमता २३५ वर पोहोचणार आहे. सध्या २१६ स्लॉटचा वापर सुरू असून, उर्वरित स्लॉट विमानांच्या उपलब्धतेनुसार नवीन कंपन्यांना दिले जातील. या विस्तारामुळे दिल्ली, बंगळूर, हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या मेट्रो शहरांच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

पुण्याची देशांतर्गत कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. १५ अतिरिक्त स्लॉटमुळे सोलापूर, तिरुपती आणि मंगळूर यांसारख्या नवीन मार्गांवर सेवा सुरू होण्यास मदत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande