पालघर - अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न
पालघर, 31 मार्च (हिं.स.)। पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. काल दिनांक 30 मार्च रोजी जननायक बिरसा मुंडा सभागृह जिल्हा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांचा  सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न


पालघर, 31 मार्च (हिं.स.)। पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

काल दिनांक 30 मार्च रोजी जननायक बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर येथे का कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगडे, उपजिल्हाधिकारी (सा) रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, भावना विचारे, हबीब शेख तसेच शिंदे यांचे कुटुंबीय वडील उद्धवराव शिंदे,पत्नी अनिता शिंदे मुलगी हर्षाली शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रवींद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले. प्रशासनात ठाम निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांप्रती असलेली संवेदनशीलता यांचा त्यांनी उत्तम समन्वय साधला, असे त्यांनी नमूद केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आपल्या खुमासदार आणि ओघवत्या शैलीत रवींद्र शिंदे यांच्यासोबतचे कार्यानुभव मांडले. शिंदे यांची कामावरील निष्ठा, निर्णयक्षमता आणि कठोरतेसोबतच असलेली मानवी बाजू यांचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. “शिस्त आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधणारा अधिकारी म्हणून शिंदे यांची ओळख कायम राहील,” असे ते म्हणाले.

तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनीही शिंदे यांच्यासोबतच्या प्रशासकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांना उजाळा देत त्यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत कामे प्रभावीपणे पूर्ण करण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande