
नांदेड, 31 मार्च (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे हजरत सय्यद बाबुपिर रहेमतुल्ला अलैह उर्स शरीफ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ एप्रिल रोजी गुरूवारी रात्री १०.३० वाजता माली पटेल यांच्या वाड्यातून संदल निघणार आहे. गावातील प्रमुख मार्गाने हजरत सय्यद बाबुपिर दर्गा शरीफ येथे संदल मिरवणुक पोहचणार आहे. तसेच दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. रात्री ठिक ८ वाजता दर्गाह परिसरात गायक नसीम जानी नागपूर व तहेसिना ताज बेंगलुर यांचा कव्वालीचा मुकाबला होणार आहे.
तालुक्यातील धामणगाव येथे दरवर्षी हजरत सय्यद बाबुपीर रहेमतुल्ला अलैह उर्सनिमित्त कार्यक्रमास व दर्शनासाठी ग्रामस्थासह बाहेरगावाहून भाविक धामणगावात दाखल होतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उर्सनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन उर्स कमिटीचे अध्यक्ष जैनु पटेल, उपाध्यक्ष इब्राहिम पटेल, सचिव इसाक पटेल, खालेद सादीक पटेल, कोषाध्यक्ष मलिक पटेल, उमर पटेल, निजाम पटेल, रियाज पटेल, मकसूद बाबा पटेल, पाशा पटेल, जीलानी पटेल, हमीद पटेल, बाबु पटेल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis