चंद्रपूर : विशेष सभेत होणार १६ स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती
चंद्रपूर, 04 मार्च, (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदांच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली सभा उद्या ५ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिय
चंद्रपूर : विशेष सभेत होणार १६ स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती


चंद्रपूर, 04 मार्च, (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदांच्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली सभा उद्या ५ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर सभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २० (१) व २० (२) मधील तरतुदीनुसार १६ स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

पक्षाच्या गट नेत्यांकडुन स्थायी समिती सदस्यांची नावे महापौर यांच्याकडे बंद लिफाफ्यात सुपूर्द केली जाणार असुन त्यानंतर महापौर यांच्याद्वारे सदस्यांची नावे घोषित केली जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande