मुर्तीजापूर : मुलांशी संबंधित संशयास्पद महिला पकडली; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला, 04 मार्च (हिं.स.) : मुर्तीजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मुलं पळवण्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज स्थानिक अण्णाभाऊ साठे नगर भागात एका अज्ञात महिलेने लहान मुलांना फूस लावून नेण्याचा प्रयत्न केल्याचा सं
मुर्तीजापूर : मुलांशी संबंधित संशयास्पद महिला पकडली; पालकांमध्ये भीतीचे वातावरण


अकोला, 04 मार्च (हिं.स.) : मुर्तीजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मुलं पळवण्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज स्थानिक अण्णाभाऊ साठे नगर भागात एका अज्ञात महिलेने लहान मुलांना फूस लावून नेण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आल्यावर नागरिकांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

यासंदर्भातील माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे नगर परिसरात ही महिला संशयास्पदरीत्या वावरत होती. तिने स्थानिक मुलांशी संपर्क साधून त्यांना सोबत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून तिला जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी बस स्टँड परिसरातही अशीच एक घटना घडली होती, ज्यामुळे पालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. स्थानिक रहिवाशांनी म्हटले, आमच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुर्तीजापूर पोलीस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत सखोल तपास सुरू केला असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

तसेच प्रशासनाकडून नागरिकांना खालील गोष्टींचे आवाहन करण्यात आले आहे:

अफवांवर विश्वास ठेवू नका: खात्रीशिवाय सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास ठेवू नका.

सतर्क राहा: आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा आणि अनोळखी व्यक्तीशी बोलताना सावधगिरी बाळगा.

कायदा हातात घेऊ नका: संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तिला मारहाण न करता तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.

या घटनेमुळे परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून, पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande