सोलापूरकरांनी दिलेली शहर विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याला नगरसेवकांचे प्राधान्य - महापौर
सोलापूर, 04 मार्च, (हिं.स.)। सोलापूरकरांनी प्रगतीसाठी विश्वासाने सर्व नगरसेवकांना निवडून दिले आहे. सोलापूरकरांनी दिलेली शहर विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याला सर्व नगरसेवकांचे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले. उद्योगवर्
jhgf


सोलापूर, 04 मार्च, (हिं.स.)। सोलापूरकरांनी प्रगतीसाठी विश्वासाने सर्व नगरसेवकांना निवडून दिले आहे. सोलापूरकरांनी दिलेली शहर विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याला सर्व नगरसेवकांचे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले. उद्योगवर्धिनी संस्था आणि केतन वोरा मित्र परिवारातर्फे ५३ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

उद्योगवर्धिनी संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, केतन वोरा, उद्योगवर्धिनी संस्थेचे मार्गदर्शक समिती सदस्य आनंद जोशी उपस्थित होते. याप्रसंगी नूतन नगरसेवकांचा शाल, पुस्तक, नॅपकिन बुके देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शिवसेनेचे गटनेते आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे गटनेते आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वैभव हत्तुरे, उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापौर श्री. कोंड्याल म्हणाले, शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त माहिती मिळण्याकरिता सर्व नगरसेवकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पाणी, धुळमुक्ती, पर्यावरण, गोशाळा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विविध चाळींसह शहरातील नागरिकांना सुविधा, स्मशानभूमी सुधारणा आधी विषयांवर आगामी काळात काम करण्यात येणार आहे. उद्योगवर्धिनी संस्था विशेषतः महिलांसाठी सातत्याने उपक्रम राबवत आहे. समाजातील दहा हजार गरजू महिलांना रोजगार देण्याचे कौतुकास्पद काम उद्योगवर्धिनी संस्थेने केले आहे, असेही महापौर कोंड्याल याप्रसंगी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande