छ. संभाजीनगर - हॉकीपटू धनराज पिल्ले यांची विद्यापीठास भेट
छत्रपती संभाजीनगर, 04 मार्च (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या क्रीडा विभागाला आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी मंगळवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकची पाहणी क
छ. संभाजीनगर - हॉकीपटू धनराज पिल्ले यांची विद्यापीठास भेट


छत्रपती संभाजीनगर, 04 मार्च (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या क्रीडा विभागाला आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी मंगळवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

भेटीदरम्यान कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी धनराज पिल्ले यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. उदय डोंगरे तसेच जिल्हा ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी धनराज पिल्ले यांच्यासमवेत विद्यापीठ क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबत सविस्तर चर्चा झाली.

चर्चेदरम्यान धनराज पिल्ले यांनी नव्या सिंथेटिक ट्रॅकच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या शुभहस्ते भूमिपूजनाने झाल्याची आठवण सांगितली. ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मैदानावर उपस्थित राहण्याचा योग लाभल्याने मानसिक समाधान मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच क्रीडा विभागाचे डॉ. मसूद हाश्मी, डॉ. अभिजित दिक्खत, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, गणेश कड, रामेश्वर विधाते, मोहन वाहिलवार आणि विलास भालेराव आदींचीही उपस्थिती होती.

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande