नाशिक - आयमा बीओपीपी सदस्यपदी पाच उद्योजकांची निवड
नाशिक, 04 मार्च (हिं.स.) : अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) औद्योगिक संघटनेच्या बोर्ड ऑफ प्रेसिडेंटच्या द्विवार्षिक निवडणुकीद्वारे पाच सदस्यीय समितीत ज्ञानेश्वर गोपाळे, धनंजय बेळे, संदीप सोनार, वरून तलवार, विवेक पाटील यांची निवड
नाशिक - आयमा बीओपीपी सदस्यपदी पाच उद्योजकांची निवड


नाशिक, 04 मार्च (हिं.स.) : अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) औद्योगिक संघटनेच्या बोर्ड ऑफ प्रेसिडेंटच्या द्विवार्षिक निवडणुकीद्वारे पाच सदस्यीय समितीत ज्ञानेश्वर गोपाळे, धनंजय बेळे, संदीप सोनार, वरून तलवार, विवेक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या पाच सदस्यांतून बीओपीपी चेअरमन पदाची निवड होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या सर्व समिती सदस्यांना आयमा व निमा या संस्थांसाठी कामकाजाचा अनुभव असल्याचे लक्षात घेऊन त्यांची निवड केल्याचे समजते. आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. आयमा रिक्रिएशन सेंटर येथे झालेल्या बैठकीत आयमाचे आयपीपी ललित बुब यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला, यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष भास्कर कोतवाल, जे. एम. पवार, बिपीन बटाविया, विजय तलवार, जे. आर. वाघ, धनंजय बेळे, संदीप सोनार, ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी, विवेक पटेल, राजेंद्र अहिरे, वरुण तलवार अविनाश बोडके आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande