गीतकार होण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकणे आवश्यक - संगीतकार मिलिंद जोशी
छत्रपती संभाजीनगर, 04 मार्च (हिं.स) । कुठलीही कला त्याच दर्जाची करण्यासाठी त्याचे शास्त्र येण्याची गरज आहे. हे शास्त्र जड वाटत असले तरी ते गीतलेखनासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मिलिंद जोशी यांनी केले. मराठी विभागाच्या सभागृहात प्रा.वा.ल. कुळकर्णी
गीतकार होण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकणे आवश्यक - संगीतकार मिलिंद जोशी


छत्रपती संभाजीनगर, 04 मार्च (हिं.स) । कुठलीही कला त्याच दर्जाची करण्यासाठी त्याचे शास्त्र येण्याची गरज आहे. हे शास्त्र जड वाटत असले तरी ते गीतलेखनासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मिलिंद जोशी यांनी केले. मराठी विभागाच्या सभागृहात प्रा.वा.ल. कुळकर्णी व्याख्यानमालेअंतर्गत गीतलेखन कार्यशाळा व व्याख्यान संपन्न झाले. यावेळी विचारमंचावर विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य यांची उपस्थिती होती.

पुढे मिलिंद जोशी म्हणाले, माझ्या गुरूपैकी कुसुमाग्रज एक होय. त्यांच्या कवितेचे संपादन करण्याचे पाप केले आहे. कविता आणि गाणी यातील अंतर संपवयाचे आहे. गदिमा जेव्हा गीत लिहायचे तेव्हा गाणं आणि कविता यातलं अंतर स्पष्ट करूच शकत नव्हतो. कवितेत चाल दडलेली असते. चांगला कवी असला तरी चांगला गीतकार होण्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकावे. शास्त्रीय संगीताचा कंटाळा येतोय हे वरवरचे वाक्य आहे. शब्दांची निवड, शब्दांची लांबी याचा आतापासूनच विचार करा. मुक्तछंदात सुद्धा छंद असला पाहिजे. आपण जे लिहू त्याच्या शब्दकळा माहिती पाहिजे. गीतकार म्हणून आपण कागदाच्या पातळीवर पूर्ण असले पाहिजे. गीतलेखनात बोलल्यासारखी भाषा पाहिजे. दोघांत असेल तर संवाद हवा. गीतलेखन कसे करावे याचे प्रात्यक्षिकासह उलगडून दाखविले. स्क्रीनवर काही चित्रपटांची गीतेही त्यांनी ऐकवली.

प्रास्ताविकात डॉ.दासू वैद्य म्हणाले, मराठी भाषा दिन जगभर साजरा होत आहे. माणसाजवळच अंगठा आणि भाषा आहे. भाषा ही सायकलसारखी असते. मराठी व्यवहाराची-वापराची भाषा झाली पाहिजे. आपण जिथे जिथे शक्य असेल तिथे मराठी भाषेचा वापरच करावा. माणूस म्हणून मोठेपण कुसुमाग्रजांकडे होतं. असं व्यक्तिमत्त्व संतत्वाकडे जातं. वा.ल.कुळकर्णी या विभागाचे पहिले प्रमुख होते. ते एकमेव असे प्राध्यापक होते की, कुलगुरूनंतर कोट घालायचे. भारतीय माणूस फक्त अन्न खात नाही तो गाणे, गोष्टी ऐकत असतो. गाणे म्हणणे प्रफुल्ल मनाची अवस्था आहे. चाल गाण्यालाच नसते तर जगण्यालाही असते. जगण्याला चाल असली तर गाण्याला चाल असते. या कार्यशाळेतून एखादा गीतकार, गायक तयार झाला तर ती महत्त्वाची गोष्ट आहे. या कार्यशाळेत सत्तरपेक्षा अधिक जणांना सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. रामेश्वर वाकणकर, डाॅ.आकाश पवार, डाॅ. कोंडबा हाटकर, डाॅ.अण्णासाहेब सोनवणे, डाॅ. विलास गायकवाड, हर्षाली शेवाळे, बापूराव वऱ्हाडे, सखाराम आव्हाड, केशरचंद राठोड, अनिल कनिसे, राजेश जाधव, पूजा भगत, सानिया बेग आदींनी प्रयत्न केले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande