एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिसंवादाच्या मालिकेचे आयोजन
लातूर, 04 मार्च (हिं.स.)। लातूर येथील नामांकित एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात ६ व ७ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “कौशल्य विकास, संवाद व लिंग समता यामधील महिलांची भूमिका” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आल
बिडवे इंजिनिअरींग


लातूर, 04 मार्च (हिं.स.)।

लातूर येथील नामांकित एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात ६ व ७ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “कौशल्य विकास, संवाद व लिंग समता यामधील महिलांची भूमिका” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन सहभागी होणार आहेत. जपान येथील तज्ज्ञ कोटा नागोची मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच ६ ते ७ एप्रिल दरम्यान “फ्युगेन कृत्रिम बुद्धिमत्ता २६ वा राष्ट्रीय परिसंवाद” (भारतीय तांत्रिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने) आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात विविध तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील पदवी, पदविका व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

महाविद्यालयातील संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे १६ ते २० मार्च दरम्यान “शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे २० ते २४ मार्च दरम्यान “अँटेना रचनेतील अलीकडील प्रवाह” या विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रीय परिसंवाद व विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य शेखर जागदे, उपप्राचार्य प्रा.वी.एस.बाळे तसेच सर्व विश्वस्त, संकुल संचालक डॉक्टर मोहन बुके यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande