सातारा गॅझेट लागू न झाल्यास पुन्हा आंदोलन : मनोज जरांगे
सोलापूर, 04 मार्च (हिं.स.)मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे याचा फायदा गरजूंना होत असून, ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. यानंतर सातारा संस्थान गॅझेट व कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर याचा फायदा राज्यातील वंचित समाज बांधवांना होणार आ
manoj


सोलापूर, 04 मार्च (हिं.स.)मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे याचा फायदा गरजूंना होत असून, ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. यानंतर सातारा संस्थान गॅझेट व कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर याचा फायदा राज्यातील वंचित समाज बांधवांना होणार आहे. सात तारखेपर्यंत या संदर्भात सकारात्मक निर्णय अपेक्षित असून तो न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.

शहीद जवान नवनाथ गात यांच्या २३ व्या स्मृतीदिनानिमित्त वरकुटे (ता. करमाळा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डाॅ. बाबूराव हिरडे हे होते. यावेळी आमदार नारायण पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गणेश करे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जरांगे-पाटील म्हणाले, गेल्या २३ वर्षांपासून शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी स्मारक समिती व ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande