पुणे - लोहगाव विमानतळाला थेट मेट्रो जोडणी
पुणे, 04 मार्च, (हिं.स.)। लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात होते. सहा विविध मार्गांवर चर्चा होऊन त्यातील व्यावहारिक मार्ग अंतिम केला आहे. त्यामुळे आता विमानतळ थेट मेट्रोमार्गाने जोडला जाईल,
Metro Train


पुणे, 04 मार्च, (हिं.स.)। लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात होते. सहा विविध मार्गांवर चर्चा होऊन त्यातील व्यावहारिक मार्ग अंतिम केला आहे. त्यामुळे आता विमानतळ थेट मेट्रोमार्गाने जोडला जाईल, अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांसंदर्भात मोहोळ यांनी प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत महत्त्वाच्या 16 विकास प्रकल्प आणि कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रोमार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे. ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गाचे काम 94 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरील 23 पैकी 13 स्टेशनचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande