लातूर - २४ तासांत अल्पवयीन मुलीचा शोध; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
लातूर, 04 मार्च, (हिं.स.)। पोलीस स्टेशन किनगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत किनगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्
किनगाव पोलीस


लातूर, 04 मार्च, (हिं.स.)। पोलीस स्टेशन किनगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत किनगाव पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत विशेष पथक गठीत केले.

प्रो. पो.उपनि. सत्यजित तोंडारे, सहाय्यक फौजदार तानाजी वल्लमपल्ले व पोलीस कॉन्स्टेबल विष्णू मामडगे यांच्या समन्वित प्रयत्नातून तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे पुणे येथून आरोपीस ताब्यात घेण्यात आले व पीडित मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली.

या जलद आणि प्रभावी कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांतून पोलिसांचे अभिनंदन होत असून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande