हिंजवडीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही महत्त्वाची पावले
पुणे, 04 मार्च (हिं.स.)। हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे
हिंजवडीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही महत्त्वाची पावले


पुणे, 04 मार्च (हिं.स.)।

हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली असून अनेक पीएमपीएमएल बसथांबे स्थलांतरित करण्यात आले आहेत.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात तुलनेत रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आयटी पार्कमधील रस्त्यावर कोंडीचे चित्र नित्याचेच बनले आहे. आता या परिस्थितीत सुधारणा करण्याचे पाऊल पडू लागले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीएमएलच्या काही प्रमुख बसथांब्यांचे स्थान बदलण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande