लातूरच्या सिध्देश्वर यात्रा महोत्सवाची आतिषबाजीने सांगता
लातूर, 04 मार्च (हिं.स.)। लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून १५ फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सव सुरु झाला होता. या महोत्सवाची सांगता सोमवारी 2 मार्च रोजी फटाक्यांच्या आतिषबाजीत सांग
सिद्धेश्वर यात्रा


लातूर, 04 मार्च (हिं.स.)। लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून १५ फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सव सुरु झाला होता. या महोत्सवाची सांगता सोमवारी 2 मार्च रोजी फटाक्यांच्या आतिषबाजीत सांगता करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हेे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे प्रशासन सचिन जांबुतकर यांची उपस्थिती होती.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने ७३ वा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १५ दिवस विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच बरोबर शेतकºयांसाठीही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी लातूर जिल्ह्यासह परजिल्हा व राज्यातील अनेक भाविक व नागरिक दररोज मोठ्या संख्येने येत होते. सदर यात्रा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी, प्रदीप राठी, मन्मथप्पा लोखंडे, अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, चंद्रकांत परदेशी, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओम गोपे आदींनी पुढाकार घेतला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande