सोलापूर - जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार
सोलापूर, 04 मार्च, (हिं.स.)। जिल्ह्यातील शेतकरी, शालेय विद्यार्थी व शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थींचे प्रश्न आता गावातच सुटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आता गावातच ‘एनए’ (अकृषिक) परवाना, सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती, प्
सोलापूर - जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार


सोलापूर, 04 मार्च, (हिं.स.)। जिल्ह्यातील शेतकरी, शालेय विद्यार्थी व शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थींचे प्रश्न आता गावातच सुटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आता गावातच ‘एनए’ (अकृषिक) परवाना, सातबारा उताऱ्यावरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार नोंद, विद्यार्थ्यांना जातीचे, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रीमिलिअर मिळणार आहे.

मे महिन्यात नगरपालिका क्षेत्रातील महसूल मंडळांमध्ये देखील समाधान शिबिरे होणार आहेत. यासाठी प्रत्येक महसूल मंडळातील शिबिरांच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व त्या त्या तालुक्याचे तहसीलदार असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. तसे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रत्येक महिन्यातील दोन दिवस महसुली मंडळाच्या गावांमध्ये अशी शिबिरे होणार आहेत, जेणेकरुन गावगाड्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न कोणत्याही मध्यस्थांशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावातच सुटतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande