परभणीतील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अत्याधुनिक त्वचारोग उपचार विभाग सुरू
परभणी, 04 मार्च (हिं.स.)। परभणीतील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अत्याधुनिक सौंदर्यशास्त्र, केसशास्त्र व लेसर उपचार विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. या नव्या विभागामुळे परभणी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना त्वचा, केस आणि स
आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अत्याधुनिक त्वचारोग उपचार विभाग सुरू


परभणी, 04 मार्च (हिं.स.)।

परभणीतील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे अत्याधुनिक सौंदर्यशास्त्र, केसशास्त्र व लेसर उपचार विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. या नव्या विभागामुळे परभणी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना त्वचा, केस आणि सौंदर्यविषयक उच्च दर्जाचे उपचार आता स्थानिक पातळीवर व अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत.

या विभागात डॉ. मनीष कदम, डॉ. दिनेश भूतडा व डॉ. रेवती राज यांच्यासह अनुभवी त्वचारोग तज्ज्ञांची टीम कार्यरत आहे. येथे केमिकल पीलिंग, मायक्रोडर्म अब्रेशनद्वारे त्वचेवरील मृत पेशी काढणे, मुरुमांचे व काळे डाग, सुरकुत्या कमी करणे आदी उपचार केले जातात.

सोरायसिस व विटिलिगो (पांढरे डाग) यांसारख्या आजारांसाठी पुव्हा थेरपी व क्रायो थेरपी उपलब्ध असून मस काढण्यासाठी वेदनारहित क्रायो थेरपीची सुविधा आहे. डायोड लेसरद्वारे टॅटू काढणे, त्वचेवरील असमान रंग कमी करणे, तसेच कॅव्हिटेशन थेरपीद्वारे शस्त्रक्रिया न करता शरीरातील चरबी कमी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

केसगळतीसाठी मेझो थेरपी, हेअर स्कॅनिंग, हेअर लेसर थेरपी तसेच टक्कल पडलेल्या पुरुष व महिलांसाठी हेअर ट्रान्सप्लांटची आधुनिक सेवा येथे सुरू करण्यात आली आहे. याशिवाय स्किन व्हाइटनिंग व बायोलाइट थेरपीद्वारे त्वचेला उजळपणा व तरुणपणा देण्याचे उपचारही केले जातात.

या सुविधेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, सचिव डॉ. सौ. संप्रिया पाटील व अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande