नाशिक: विविध अपघातांमध्ये दोन ठार, तीन जखमी
Two killed, three injured in three accidents
नाशिक: विविध अपघातांमध्ये दोन ठार, तीन जखमी


नाशिक, 04 मार्च (हिं.स.)।

- शहर परिसरातवेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जण ठार झाले असून, तीन जण जखमी झाल्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.

अपघाताचा पहिला प्रकार म्हसरूळ परिसरात घडला. फिर्यादी ब्रिजेश श्रीसाजराम यादव (रा. उत्तर प्रदेश) यांचा भाऊ जयकर यादव (वय २७) व प्रदीपकुमार पप्पू यादव (वय २०, दोघे रा. उत्तर प्रदेश, ह. मु. जेलरोड) हे दोघे त्यांच्या पेंटिंग कामाचे पैसे घेऊन राज स्वीट्स मार्टकडून बळी मंदिराकडे एमएच १५ एपी ४७२५ या क्रमांकाच्या मोटारसायकलीने येत होते. ते राजमाता मंगल कार्यालयाकडे आले असता बळी मंदिराकडून आलेल्या एमएच १७बीवाय ९१०३ या क्रमांकाच्या महिंद्रा पिकअपवरील चालक बाळासाहेब रामचंद्र कातोरे (रा. सांगवी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याने यादव यांच्या मोटारसायकलीला धडक दिली. त्यात फिर्यादीचा भाऊ जयकर याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला, तर त्यांचा पुतण्या प्रदीपकुमार यादव याला गंभीर दुखापत झाली असून, मोटारसायकलीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पिकअप वाहनाचे चालक बाळासाहेब कातोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बाराईत करीत आहेत.

अपघाताचा दुसरा प्रकार एकलहरा रोड येथे घडला. फिर्यादी भिकन मारुती मोरे (रा. एकलहरा गेट, देशमुखवाडी) यांचा लहान भाऊ रवींद्र मोरे हे दोघे जण नाशिकरोड येथील काम आटोपून एमएच १५ जीएम ५५५२ या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून घराकडे जात होते. हिंगणवेढा ते एकलहरा रोडवर आले असता समोरून भरधाव आलेल्या एमएच १५ ईजी ८७७२ या क्रमांकाच्या पिकअपवरीलचालक संतोष मुरलीधर बैरागी (रा. नायगाव, ता. सिन्नर) याने मोटारसायकलीला धडक दिली. त्यात फिर्यादीचे भाऊ रवींद्र मारुती मोरे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालक संतोष बैरागीविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

अपघाताचा तिसरा प्रकार जेलरोड येथे घडला. फिर्यादी मनोज शंकर शिंदे (रा. लोखंडे मळा, जेलरोड) यांचे वडील एमएच १५ ईव्ही ९८६५ या क्रमांकाची सुझुकी अॅक्सेस मोपेड घेऊन नातवाला क्लासवरून घरी आणण्यासाठी गेले होते. जेलरोडवरील महारुद्र कॉलनीसमोर भरधाव आलेल्या अज्ञात वाहनचालकाने त्यांच्या मोपेडला धडक दिली. त्यात त्यांच्या जीवितास धोका निर्माण करून वाहनचालक अपघात करून पळून गेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande