पुणे जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीसाठी चुरस
पुणे, 04 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने तेथील समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. त्यामुळे मुळशी, जुन्नर आणि भोर पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदासाठी चुरस अधिक रंगण्याची चिन्हे आहेत. सोमवारी सभापती व उपस
पुणे जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीसाठी चुरस


पुणे, 04 मार्च (हिं.स.)।

जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने तेथील समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. त्यामुळे मुळशी, जुन्नर आणि भोर पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदासाठी चुरस अधिक रंगण्याची चिन्हे आहेत. सोमवारी सभापती व उपसभापतिपदांसाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. तालुकानिहाय राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडून आलेले सदस्य आपापली मोर्चेबांधणी करीत आहेत. पक्षश्रेष्ठींकडून तालुकास्तरीय बैठका घेतल्या जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांनी तालुकानिहाय बैठकांना वेग दिला आहे. सर्वच पक्षांच्या तालुकाध्यक्षांकडून नवनिर्वाचित सदस्य व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठीही संभाव्य कल तपासला जात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग््रेास आणि भाजप या प्रमुख पक्षांकडून बैठका सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande