पुण्यातील मुळा नदीला प्रदूषणामुळे फेस; मैलामिश्रित पाणी नदीपात्रात
पुणे, 04 मार्च, (हिं.स.)। पिंपळे निलख चोंधे लॉन्स येथील मुळा नदीपात्रात विशालनगर ते बालेवाडीला जोडणाऱ्या बंधाऱ्याजवळील विसर्जन घाट परिसरात कोणतीही प्रक्रिया न करता थेट मैलामिश्रित पाणी सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पाण्
पुण्यातील मुळा नदीला प्रदूषणामुळे फेस; मैलामिश्रित पाणी नदीपात्रात


पुणे, 04 मार्च, (हिं.स.)। पिंपळे निलख चोंधे लॉन्स येथील मुळा नदीपात्रात विशालनगर ते बालेवाडीला जोडणाऱ्या बंधाऱ्याजवळील विसर्जन घाट परिसरात कोणतीही प्रक्रिया न करता थेट मैलामिश्रित पाणी सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर पांढऱ्या फेसाचे थर दिसत असून, काही ठिकाणी काळसर रंगाचा मैलामिश्रित गाळ साचलेला आढळून येत आहे.

शहराच्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली मुळा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. काही महिन्यांपासून मुळा नदीपात्रात अस्वच्छ पाण्याचा ओघ सातत्याने वाढत आहे. सांडपाण्यातील रासायनिक घटक, डिटर्जंट्स आणि सेंद्रिय कचरा यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण घटत असून जलजीवसृष्टीसाठी ही स्थिती अत्यंत घातक ठरत आहे. मासे व इतर सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वावर याचा गंभीर परिणाम होत आहे. फेसाळलेले पाणी आणि असह्य दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यावरण संरक्षण कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन होत असतानाही संबंधित विभागांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande