
नाशिक, 05 मार्च (हिं.स.)।
:- महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट तिथीनुसार उद्या (दि.६) शिवजयंती साजरी करणार आहे.
शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून काल, आज आणि उद्या ही जयंती तिथी नुसार साजरी करणार आहेत. राज्यात हिंदू तिथीने शिवजयंती सर्व जुने नवीन मंडळे साजरी करत आले आहे. परंतु मागील काही वर्षांपासून तारखेचा घोळ सुरू आहे. आपले सर्व सण हे तिथीनुसार साजरे केले जातात. शिवरायांची जयंती सर्व शिवभक्त फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार म्हणजे यंदा ६ मार्च रोजी शिव जयंती साजरी करणार आहेत. सर्व जुने नाशिक व शिवभक्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीला साजरी करणार आहेत. हिंदू एकता आंदोलन पक्ष तिथी नुसार येणारी शिवजयंती राज्यातील नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, पुणे, धुळे यासह अनेक जिल्ह्यात साजरी होणार आहे. हिंदु एकताची मिरवणूक पारंपरिक मार्ग वाकडीबारव येथून साधू संतांच्या साक्षीने व महापौरांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता निघणार आहे. हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळाचे प्रेरणास्थान रामसिंग बावरी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथीनुसार शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी शिवम पवार यांची निवड करण्यात आली आहे. यासोबत प्रसाद बावरी (विशेष कार्यकारी अधिकारी), किरण पवार (मिरवणुक प्रमुख) शाम पवार, अतुल रणसिंगे, उमेश पाटील, रमेश कुमावत, अनिल जाधव, विजय पवार, स्वप्निल काठवते, देवा पवार, जिवा पवार, प्रतीक कसबे, भारत सदभैया आदींची निवड करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV