रायगड येथे 16 मार्च रोजी डाक अदालतीचे आयोजन
रायगड, 05 मार्च (हिं.स.) :रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या डाक सेवांबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रायगड डाक विभागात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही डाक अदालत सोमवार, १६ मार्च २०२६, रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर, रायगड विभाग कार्याल
Postal Court on March 16 for complaints on postal services


रायगड, 05 मार्च (हिं.स.) :रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या डाक सेवांबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी रायगड डाक विभागात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही डाक अदालत सोमवार, १६ मार्च २०२६, रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर, रायगड विभाग कार्यालय, अलिबाग येथे होणार आहे, अशी माहिती अधीक्षक डाकघर कार्यालयाकडून दिली गेली आहे.

अदालतीत नवी मुंबई रिजन अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित तक्रारींचा आढावा घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. विशेषतः टपाल सेवा, स्पीडपोस्ट, काउंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर या सेवांशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. सहा आठवड्यांच्या आत निवारण न झालेल्या तक्रारी या अदालतीत ग्राह्य धरल्या जातील.

तक्रार नोंदविताना ग्राहकांनी तक्रार दाखल केलेली तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद, तसेच आवश्यक कागदपत्रे नमूद करणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार दोन प्रतींमध्ये अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग – ४०२२०१ या पत्त्यावर १३ मार्च २०२६ पूर्वी पाठवावी, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.या उपक्रमामुळे नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे जलद निवारण होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande