
अकोला, 05 मार्च 2026 – अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा दि. 10 मार्च 2026, सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृह, अकोला महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसुची “ड” प्रकरण 2 चे कलम 3(अ) अंतर्गत होणार आहे.
सभेच्या कामकाजाची मुख्य मुददे पुढीलप्रमाणे आहेत:
मानधनवाढ – कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याबाबत मान्यता प्रदान करणे.
भूखंड विकास प्रकल्प – अकोला शहर नझूल शिट क्र.39-बी, भूखंड क्रं. 82/1 व 82/2 येथील शासनाच्या मालकीच्या जागेवरील आरक्षण क्र. 100 (नाट्यगृह व व्यापारी संकूल) व आरक्षण क्र. 198 (वाहन तळ) बि.ओ.टी. तत्वावर विकसीत करण्याबाबत प्रस्तावित प्रकल्प.
औषधी खरेदी – 15 व्या वित्त आयोग अंतर्गत औषधी खरेदीसाठी स्थायी समितीची मंजुरी मिळणे.
पाणी पुरवठा योजना देखभाल – सन 2025-26 अंतर्गत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण झोन तसेच महान जलशुध्दीकरण केंद्र व मुख्य पाईपलाइनसाठी वार्षिक देखभाल व दुरुस्तीस मान्यता मिळणे.
स्थायी समितीच्या या बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय घेतल्यास शहरातील प्रशासन व नागरी सुविधा सुधारण्यात मोठा हातभार लागेल.
------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे