
अकोला, 05 मार्च 2026 – अकोला महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे सोमवार, 09 मार्च 2026, दुपारी 1.30 वाजता विशेष सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, अनुसुची प्रकरण-2, नियम 1(क) व (ड) अंतर्गत होणार आहे.
सभेत चर्चेला येणाऱ्या मुख्य मुद्यांमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत:
वार्षिक भाड्यावरील दुकाने/प्लॉट सुधारणा – अकोला महानगरपालिका हद्दीतील सर्व साधारण सभा ठराव क्र. 12 (दि. 12.07.2018) अन्वये वार्षिक भाड्यावरील दुकाने/प्लॉट अंतर्गत वाणिज्य वापरासाठी दिलेल्या शिघ्रसिद्ध गणकाचे (रेडी रेकनर) दरांमध्ये आवश्यक सुधारणा.
बोअर दुरुस्ती – अस्तित्वात असलेल्या बोअरचा रीबोअर करून दुरुस्ती करणे.
विकास कामांची ना हरकत प्रमाणपत्रे – अकोला महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत चर्चा.
सभेतील निर्णयांमुळे महानगरपालिकेच्या प्रशासनिक कामकाजात सुधारणा होण्यास तसेच शहरातील नागरी सुविधा अधिक सुचारू करण्यास मदत होईल.
----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे