

अग्निशमन दलाने 5 सिलेंडर बाहेर काढून टाळला अनर्थ
अकोला, 05 मार्च (हिं.स.)।अकोला शहरातील रामनगर परिसरात गुरुवारी एका बंद पडलेल्या कॅफेमध्ये अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. सार्थक चिल्ड्रन हॉस्पिटलसमोर असलेल्या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘रोहित वडे वाला कॅफे’मध्ये ही आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
दरम्यान कॅफेमध्ये ठेवलेले पाच गॅस सिलेंडर अग्निशमन दलाने सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे