अकोला : नियोजनभवनात परिचारिका, आरोग्य कर्मचा-यांसाठी कार्यशाळा!
अकोला, 05 मार्च (हिं.स.)।आरोग्य क्षेत्रात सांख्यिकीचे मोठे महत्व आहे. ‘डेटा’ अचूक नसेल तर विश्लेषणही सदोष होऊ शकते. धोरणे बनविण्यातही अडचणी येतात. रूग्णसेवेत नोंदी घेण्याची प्रक्रिया व अहवाल सादरीकरण बिनचूक असले पाहिजे. त्यामुळे यासंबंधीचे प्रशिक्ष
Photo


अकोला, 05 मार्च (हिं.स.)।आरोग्य क्षेत्रात सांख्यिकीचे मोठे महत्व आहे. ‘डेटा’ अचूक नसेल तर विश्लेषणही सदोष होऊ शकते. धोरणे बनविण्यातही अडचणी येतात. रूग्णसेवेत नोंदी घेण्याची प्रक्रिया व अहवाल सादरीकरण बिनचूक असले पाहिजे. त्यामुळे यासंबंधीचे प्रशिक्षण परिचारिका व आरोग्य कर्मचा-यांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी व्यक्त केले.

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व सुश्रुषा सवर्ग ग्रुप यांच्या वतीने निरंतर परिचर्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘रूग्णसेवेत प्रभावी रेकॉर्डिंग व रिपोर्टिंग’ याविषयी प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनभवनात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपसंचालक डॉ. सुशील कुमार वाघचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य सरिता राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधा जोगी, आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मीना म्हणाल्या की, परिचारिका, आरोग्य कर्मचा-यांकडून माहिती व सांख्यिकी अचूक भरली गेली नाही तर त्याचा सांख्यिकीय अहवालावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विश्लेषणही चुकीचे होते, तसेच जिल्हा व राज्यस्तरावर धोरणे ठरविण्यात अडचणी निर्माण होतात. अचूक डेटा लोकोपयोगी निर्णयांसाठी उपयुक्त ठरत असतो. प्रशिक्षण शिबिरात परिचारिका व आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रुग्णसेवेत योग्य नोंद व अहवाल यांचे महत्त्व व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय, खासगी रूग्णालयांतील परिचारिका, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande