
परभणी, 05 मार्च (हिं.स.)।मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेलो इंडिया सेंटर तसेच जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खेलो इंडिया अंतर्गत ‘अस्मिता लिग’ मुली व महिलांसाठी धावण्याच्या स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. मुली व महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 13 वर्षांपर्यंत मुली, 13 ते 18 वर्षे वयोगटातील मुली तसेच 18 वर्षांवरील मुली व महिलांसाठी वेगवेगळ्या गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये 100 मीटर, 200 मीटर व 400 मीटर धावण्याच्या शर्यतींचा समावेश आहे. प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंना खेलो इंडिया व मेरा युवा भारत यांच्या वतीने पदक व प्रमाणपत्र तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://nsrs.kheloindia.gov.in तसेच माय भारत या लिंकवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. ही स्पर्धा 8 मार्च रोजी सकाळी 9.00 वाजता सुरू होणार आहे. ‘खेल से ही है पहचान’ अस्मिता लिग धावणे स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या खेळाडूंना भारतीय खेल प्राधिकरण व खेलो इंडिया मार्फत भविष्यात तांत्रिक मार्गदर्शन मिळण्याची संधी असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुली व महिलांनी या स्पर्धेत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी गीता साखरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis