परभणी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 7 मार्च ते 15 मे कालावधीत होणार
परभणी, 05 मार्च (हिं.स.)। नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित प्रश्नांचे निराकरणे करणे व जनतेच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म
परभणी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 7 मार्च ते 15 मे कालावधीत होणार


परभणी, 05 मार्च (हिं.स.)।

नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित प्रश्नांचे निराकरणे करणे व जनतेच्या तक्रारी तात्काळ निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ अंतर्गत जिल्ह्यात 52 मंडळस्तरावर दि.७ ते १४ मार्च व एप्रिल महिन्यात १० ते १७ एप्रिल या कालावधीत तर नगरपालिकास्तराव ८ ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

परभणी जिल्ह्यात हे अभियान राबविण्याची तयारी प्रशासनाने केली असून त्याचे नियोजन या प्रमाणे तालुका/मंडळ स्तरावर शिबीर 7 मार्च, 14 मार्च, 20 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल व 24 एप्रिल 2026 तर नगरपरिषद / नगरपंचायत स्तरावर 8 मे व 15 मे 2026 रोजी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडळस्तरावर शिबीरांच्या वेळापत्रकानुसार परभणी तालुक्यात 7 मार्च रोजी परभणी ग्रामीण, 14 मार्च रोजी सिंगणापूर, 10 एप्रिल रोजी दैठणा, 17 एप्रिल रोजी झरी, 20 मार्च रोजी पेडगाव, 27 मार्च रोजी पिंगळी, 24 एप्रिल रोजी जांब, 15 मे रोजी टाकळी कुंभकर्ण.

गंगाखेड तालुक्यात 7 मार्च रोजी राणीसावरगाव, 14 मार्च रोजी माखणी, 10 एप्रिल महातपूरी, 17 एप्रिल पिंपळदरी.

पालम तालुक्यात 7 मार्च रोजी चाटोरी, 14 मार्च रोजी बनवस, 10 एप्रिल रोजी पेठशिवणी, 17 एप्रिल रोजी रावराजूर.

पूर्णा तालुक्यात 7 मार्च ताडकळस, 14 मार्च रोजी चुडावा, 10 एप्रिल रोजी कातनेश्वर, 17 एप्रिल रोजी निमला, 20 मार्च रोजी कावलगाव.

सेलू तालुक्यात 7 मार्च रोजी वालूर, 14 मार्च रोजी कुपटा, 10 एप्रिल रोजी चिकलठाणा बु., 17 एप्रिल रोजी देऊळगाव गात, 20 मार्च मोरेगाव.

जिंतूर तालुक्यात 7 मार्च रोजी सावंगी म्हा. 14 मार्च रोजी बोरी, 10 मार्च रोजी चारठाणा, 17 मार्च रोजी आडगाव, 20 मार्च रोजी बामणी, 17 मार्च रोजी दुधगाव, 15 मे रोजी वाघी धानोरा.

पाथरी तालुक्यात 7 मार्च रोजी बाभळगाव, 14 मार्च रोजी हदगाव बु., 10 एप्रिल रोजी कासापुरी.

मानवत तालुक्यात 7 मार्च रोजी केकरजवळा, 14 मार्च रोजी कोल्हा, 10 एप्रिल रोजी ताडबोरगाव, 17 एप्रिल रोजी रामुपुरी बु.

सोनपेठ तालुक्यात 7 मार्च रोजी आवलगाव, 14 मार्च रोजी वडगाव, 10 एप्रिल रोजी शेळगाव मराठा येथे होणार आहे.

नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर जिल्हयात 8 मे 2026 रोजी परभणी शहर, गंगाखेड, पालम, पूर्णा, सेलू, जिंतूर, पाथरी, मानवत, सोनपेठ येथे शिबीर होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande